YASHASHWI 5a8b0fb10edd050ae8a59da5 False 89 16
OK
background image not found
Updates
2018-09-04T09:13:08
थंड शुद्ध पाण्याचा व्यवसाय शुरू करण्यासाठी फक्त 300000/- रू मधे शुरू करू शकता हा व्यवसाय आणि 5 हजार रू ते 1लाख नफा कमाऊ शकता. आज आम्ही आपल्याला एक अशा व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत कि जो असा तर वर्षभर चालतो पण उन्हाळ्यामधे आणि लग्नाच्या सिझन मधे खूप जोरात चालतो.कमी लागत आणि कमी वेळेत शुरू होणारा हा व्यवसाय टफ कंडीशन मधेही 50% पेक्षा ही जास्त नफा देतो. ऑफिस, दुकाने तसेच घरात ही पाण्याची डिमांड वर्षभर असते पण उन्हाळ्याच्या सिझन मधे या पाण्याची मागणी खूप वाढते. या व्यवसायामध्ये साधारणतः 20 लिटर च्या जार मधे पाणी सप्लाय करण्यात येते. * हा व्यवसाय कसा सुरू करायचा ? सर्वप्रथम ह्या व्यवसायासाठी आपल्याला जागा पाहिजे. जागा आपली असेल तर किराया वाचेल आणि जर का तुम्हाला जागा किरायाने घ्यायची असेल तर ती शहरा पासून थोडा दूर घ्यायची तर किराया कमी लागेल. आता प्रश्न असा आहे की जागा किती पाहिजे.या करिता कमीतकमी 450 वर्ग मीटर ते 600 वर्ग मीटर आवश्यकता राहील. ज्यामध्ये Reverse Osmosis (RO) किंवा पाणी शुद्ध करण्याची मशीन लागेल आणि इतर कामा करिता जागा उपयोगी पडेल. या जागेत 1000 लिटर पाण्याची टाकी ठेवण्याची आवश्यकता पडेल ज्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवण्यात येईल. कमीतकमी 50 ते 100 जार नेहमी तयार ठेवायला पाहिजे. हा व्यवसाय तुम्ही लहान लेव्हल वरती करणार असाल तरिही तुम्हाला दोन ते तीन लोकांची आवश्यकता असेल. * किती कॅपिसिटीची RO मशीन पाहिजे? आता आपन जाणून घेऊ कि मशीन ची निवड कशी करावी. या करिता वेगवेगळ्या कॅपिसिटीच्या मशीन येतात जसे- 250 , 500 , 1000 , 2000 लिटर/ प्रति तास. आपल्याला मशीन घेण्यापूर्वी हे जाणून घेणं आवश्यक आहे की तुम्ही हा व्यवसाय कोणत्या स्तरावर करणार आहात. मशीन फिटिंग आणि ट्रान्स्पोर्ट चा खर्च 5 ते 15 हजार असू शकतो. * मशीन व्यतिरिक्त आणखी काय पाहिजे? पाणी थंड करण्याकरिता चिलर मशीन, 20 लिटर पाण्याची जार, स्टीकर्स, बोरवेल, विहीर, किंवा नल, पाण्याचा टाक्या, बाटल शिलर इत्यादी. * किती नफा होऊ शकतो? इंडस्ट्रीज च्या कॅल्क्युलेशन नुसार 20 लिटर पाण्याची जार ची लागत 3 रू ते 4रू पडेल. ही जार 15 रू मधे विकली जाते. काही काही ठिकाणी ही जार 40 रू पर्यंत विकली जाते. आम्ही 15 रू च्या रेट नी कॅल्क्युलेशन करू.समजा तुम्ही रोज 600 जार विकता तर एकूण विक्री 600×30×15= रू 270000/- आता यामधून आपल्याला लेबर चार्ज, किराया, मालभाडा आणि इलेक्ट्रीक बिल चा खर्च काढला तर एका जार वर 4 रू खर्च पडतो. यातह्रेने एक जार चा खर्च 8 रू आपल्याला पडतो आणि आपण त्या जार ला 15 रू ते 20 रू च्या रेट मधे विक्री करतो. 600×30×12=1, 26, 000/-रू अस तेव्हा होईल जेव्हा आम्ही रोज 600 जार विकू.पण शेवटी हे लक्षात घ्यायला हवे की या व्यवसामधून 50% पेक्षा जास्त नफा आहे. तुम्ही जर रोज 300 जार ही विकली तरी तुम्ही 50000रू पेक्षा अधिक प्रति महीना कमवू शकता.
2018-08-18T07:27:37
update image not found
Rain water harvesting
2018-08-13T11:50:03
update image not found
Automatic RO plant
2018-08-13T09:22:41
update image not found
Yashashwi water solution system We are all types of RO Manufacturing plant with water chiler, water ATM.
2018-08-13T09:20:05
update image not found
Yashashwi water solution system We are all type of ro manufacturing plant wih Water Chiler Machine. Non isi plant , Chiler plant, Water ATM
false